तुळजापूर / प्रतिनिधी   -

 जिल्हा परिषद सदस्य तथा  जिल्हा परिषद उस्मानाबाद शालेय  शिक्षण समितीचे सदस्य  प्रकाश चव्हाण   यांनी जिल्हा परिषद प्रशाला जळकोट  येथे   सदिच्छा भेट दिली.भेटी दरम्यान इयता  नववी व   दहावीच्या  विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी   online व offline अभ्यासा बाबत संवाद साधला. इयता दहावीची सराव परीक्षा चालू होती. शालेय  विद्यार्थीचा अभ्यास व उपस्थिती बाबत समाधान व्यक्त केले.

 यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत पाटील,ब्रह्मानंद कदम,विठू कदम, शाळेतील  मुख्याध्यापिका श्रीमती शोभा टोणपे ,शिक्षक  हनुमंत जाधवर,  तरमोडे प्रदिप, श्रीमती पुष्पलता कांबळे,  पटवारी वैभव, शिंदे महेंद्र हे उपस्थित होते.


 
Top