परंडा / प्रतिनिधी :- 

देशाच्या व समाजाच्या कल्याणाचा विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक वृत्तपत्र सुरू केले असे प्रतिपादन औरंगाबाद येथील बहुजन पत्रकारितेचे अभ्यासक डॉ सचिन बनसोडे यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या मूकनायक दिन कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून  वरील विधान व्यक्त   केले.

 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता या विषयावर त्यांनी आपले व्याख्यान दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ महेशकुमार माने उपस्थित होते .शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील जनसंवाद व पत्रकारिता विभागामार्फत मुकनायक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन नोडल अधिकारी प्रा संतोष काळे, प्रा डॉक्टर वैशाली थोरात यांनी केले होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ वैशाली थोरात यांनी केले .

       यावेळी डॉ शहाजी चंदनशिवे यांनी भारत देशातील पत्रकारिता दशा व दिशा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले .पुढे बोलताना डॉ बनसोडे म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानाचे भांडार उभे केले .वृत्तपत्र मूकनायक हे दलित चळवळीचा पाया आहे . त्याच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे . प्रत्येक समस्यांचे निरसन करण्यासाठी वृत्तपत्र असले पाहिजे .अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ महेशकुमार माने म्हणाले की या महाविद्यालयांमध्ये विभागांतर्गत प्रथमच मुकनायक दिन साजरा करण्यात आला.या महाविद्यालयांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात त्यासाठी संस्थेचे सचिव संजय निंबाळकर साहेब आणि महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ दीपा सावळे यांचे भरपूर सहकार्य लाभते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम महाविद्यालयात राबविण्यासाठी आम्हास संस्था प्रोत्साहित करत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संतोष काळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ महेशकुमार माने डॉ शहाजी चंदनशिवे, डॉ वैशाली थोरात ,डॉ प्रकाश सरवदे यांनी सहकार्य केले .कार्यक्रमाचे आभार डॉ प्रकाश सरवदे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी ,प्राध्यापक व पत्रकार मोठ्या संख्येने  ऑनलाइन गूगल मीठ या ॲप द्वारे सहभागी झाले होते.

 

 
Top