उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मागील काही वर्षाच्या सततच्या दुष्काळि परीस्थीती नंतर चांगल्या झालेल्या पावसामुळे कांदा बिजोत्पादनाकडे शेतक-यांचा कल वाढलेला आहे. यंदा बहुतांश शेतक-यांनी कांदा बिजोत्पादनासाठी कांदा लागवड केलेली आहे.परंतु बदलत्या वातावरणामुळे कांदा बिजोत्पादन उतारा येणार कमी आहे.

डिसेंबर महिण्याच्या सुरुवातीला बहुतांश शेतक-यांनी 25 ते 30 रु प्रति किलो बियाणे या प्रमाणे बहुतांश शेतक-यांनी कांदा लागवड करण्याचा प्रयोग केला होता. त्यातच सततच्या हवामान बदलामुळे तो प्रयोग अयश्वी झाला. त्यामुळे कांदा बिजउत्पादक शेतकरी सुरुवाती पासूनच अडचणीत आला. यावर्षी जवळपास सगळयाच तालुक्यात बिजोत्पादनासाठी कांदा लागवड करण्यात आलेली आहे गतवर्षी 80 ते 90 हजार प्रति क्विंटल कांदा बियाणे विकल्यामुळे या वर्षी कांदा लागवडीत वाढ झाली. शेतक-यांनी कांदा घेवून कुठल्याही कंपनी सोबत करार केलेला नाही तरी कांदा बिजउत्पादनास प्राधान्य दिलेले आहे.

डिसेंबर महिण्याच्या शेवटी व जानेवारीच्या सुरुवातीस पाती पिवळया पडणे, सड  लागणे असा मोठा परिणाम कांदा पिकावर झाला. यामुळे लागवड केलेल्या कांदयाचे मोठे नुकसान झाले आहे.याचाच परिणाम कांदा बिजोत्पादन निश्चीतच कमी होणार असे कांदा बिज उत्पादक शेतक-यामधुन बोलले जात आहे.बिजोत्पादन कांदा उत्पादनामध्ये पाणी व्यवस्थापन अतिशय महत्वाचे असून याची काळजी  शेतक-यांनी घ्यायला हवी. बदलत्या हवामानात येणा-या अडचणी संदर्भात किड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन याबाबत माहीती साठी कृषि विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.

या अधिच खरीपातील अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेली आहेत. बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी,  त्यात खरीपातील पिक विमा पण न मिळाल्यामुळे आर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे, पण शेवटी आताच्या परिस्थितीत त्यातून आलेली हतबलता यामुळे बेचैन होणे साहजिकच आहे, पण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नका, हीसुद्धा वेळ निघून जाईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असो, आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण हार मानू नका. फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्ला, मार्गदर्शन देऊन, त्रस्त शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे.फक्त शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ एक फोन करा, असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.

यासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय, गडपाटी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या  शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

 
Top