तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील जळकोट गावचे सरपंच तथा तुळजाभवानी कारखान्याचे संचालक अशोकराव पाटील व जळकोट जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य प्रकाश चव्हाण व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने गावात प्रथमच आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांनी विचारांची देवाण-घेवाण करत कार्यक्रमात रंगत आणली.

जळकोट येथील शिवाजी चौकात आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमात प्रथमतः गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर महिलांनी उखाणे घेतले. या कार्यक्रमात पंचायत समितीच्या सभापती सौ. रेणुकाताई इंगोले यांनी महिला सोबत पुरुषांनीही उखाणे घेतले पाहिजेत. असा प्रश्न उपस्थित केला. आलियाबादच्या सरपंच सौ. ज्योतिका चव्हाण यांनी महिला सक्षमीकरण संदर्भात आपले परखड मत मांडले. सौ. चव्हाण म्हणाल्या की, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने वाटचाल अंधश्रद्धेला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा.त्यामुळे विचारांची देवाण-घेवाण झाली. 

यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ. सुनीताताई पाटील, उपसरपंच सौ. श्रीदेवी कवठे, ग्रामपंचायत सदस्य सौ. दिपा कदम, माजी सरपंच सौ. अलका हिंडोळे, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुरेखा माळगे, ग्रामपंचायत सदस्य सौ. उज्वला भोगे, ग्रामपंचायत सदस्य सौ. राजश्री कागे,सौ. सुलभा कदम, सौ. सुनंदा कदम, सौ. संगीता साखरे, सौ. अश्विनी नवगिरे, सौ. कविता सुरवसे, सौ. वर्षाराणी पाटील, सौ. वैजयंती मोरे, सौ. संगीता लोखंडे, सौ. वैशाली गुळे, सौ. मीरा चव्हाण, सौ. सरिता कदम,सौ. अंजली छत्रे, सौ. मोताबाई राठोड व सौ. मीरा कदम यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात महिलांना हळदी-कुंकू व वान देऊन मकर संक्रातीची भेट देण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान सौ. वर्षाराणी कुदळे यांचा भावगीते ,भक्तिगीते व हिंदी- मराठी जुन्या गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात गावातील ११५० महिलांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत नवगिरे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, राष्ट्रवादी जिल्हा सहचिटणीस महेश कदम, शिवसेना तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, ग्रामपंचायत सदस्य जीवन कुंभार, ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साखरे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश लोखंडे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन राजकुमार पाटील, बसवराज कवठे,नामदेव कागे, अनिल छत्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र कदम, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष शंकर वाडीकर, शिवराम कदम,महादेव सावंत, किरण कदम, समाधान पाटील,श्रीनिवास पाटील, ओंकार कदम, विजय यादगौडा, शकील मुलानी, सुनील माने, लोकू राठोड, लक्ष्‍मण पांचाळ आदिसह ग्रामपंचायत सर्व कर्मचारी, युवक  यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार बबन मोरे यांनी मानले.

 
Top