तुळजापूर / प्रतिनिधी-  

मराठा आरक्षणासाठी  आमरण उपोषण करणाऱ्या छञपतीसंभाजीमहाराज  यांना   पाठींबा देण्यासाठी   आझाद मैदानात होणाऱ्या  शनिवार२६ रोजी  आमरण उपोषणात जिल्हयातील हजारो मराठा समाज बांधव सहभागी होणार असुन या आमरण उपोषणाचा आरंभ  श्रीतुळजाई चा जागरण गोंधळाने करण्यात येणार असल्याची माहीती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सज्जन सांळुके यांनी  गुरुवार दि २४रोजी पञकार परिषद घेवुन दिली.

यावेळी बोलताना साळुंके  व इंगळे पुढे म्हणाले की आज पर्यंत आम्ही सनदशिर लोकशाही मार्गाने  रस्ता रोको मूक मोर्चा धरणे आंदोलन केले तरीही शाषणाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही.  आता अंतिम लढाई शनिवारपासून आझाद मैदानावर सुरू होणार असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे आमरण उ  उपोषण चालु असणार आहे.मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिल्याने समाजावर शैक्षणिक व  सामाजिक अन्याय  झाला आहे., आरक्षणावाचून  बेरोजगार तरुण तणावग्रस्त होऊन आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतोय. कुठतरी हे थांबलं पाहिजे आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाचे दुःख, वेदना थोड्यातरी कमी व्हाव्यात, या प्रामाणिक भावनेतून सकल मराठा समाजाने राज्य शासनाकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. या मागण्यांची पूर्तता करणे शासनाच्या हातात आहे. तरीही शासन या मागण्यांकडे  पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. किमान या मागण्यांची पूर्तता करून समाजाला बसणारी झळ कमी करावी, यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती येत्या २६ फेब्रुवारी पासून मुंबई येथील आझाद मैदानावर  आमरण उपोषण करणार आहेत.तरी या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा,असे आवाहन शेवटी  मराठा क्रांती मोर्चाने केली 

यावेळी  राज्य समन्वयक सज्जन साळुंखे, छावाचे राज्यप्रवक्ते जीवनराजे इंगळे जिल्हाअध्यक्ष  महेश गवळी,अजय सांळुके ,आबासाहेब कापसे, प्रतीक रोचकरी,प्रशांत सोंजी,अण्णासाहेब क्षिरसागर, कुमार टोले,राम चोपदार आदी उपस्थित होते.


 
Top