उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा ऐतिहासिक वारसा जपणारा जिल्हा होय,हातलाई परिसर निसर्गरम्य असुन या निसर्गरम्य परिसरात हातलाई तलावातील नियोजित संगीत कारंजे लाईट अभावी प्रलंबित आहे, उस्मानाबाद पर्यटन विकास समितीने याबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे, तसेच हातलाई तलावातील संगीत कारंजे सुरू करण्यासाठी विद्युत डी पी व विद्युत कनेक्शनसाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देणेबाबत उस्मानाबाद पर्यटन विकास समिती उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन वृध्दीसाठी व त्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे हातलाई तलावामध्ये संगीत कारंजे व बोटिंग सुरुवात करावी अशी मागणी पर्यटन विकास समिती मार्फत करण्यात आली आहे. तसेच जिल्हािधकाऱ्यांना ही निवेदन देण्यात आले. 

  सदरील तलावांमध्ये जिल्हा परिषद मार्फत डीपीडीसी मधून रुपये 72.26 लक्ष निधी प्राप्त करून तलावांमध्ये संगीत कारंजे  त्याचे स्ट्रक्‍चर हायमस्ट पोल बसविण्यात आलेले आहेत मात्र विद्युत कनेक्शन अभावी सदरील संगीत कारंजे सुरू होऊ शकले नाही. आम्ही जिल्हा परिषदेकडे यासंदर्भात चौकशी केली असता डी पी व विद्युत कनेक्शनसाठी लागणाऱ्या रुपये 22 लक्ष निधीची तरतूद होणे संदर्भात जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्राद्वारे मागणी केली असल्याची माहिती मिळाली आहे तरी आपणास नम्र विनंती की आपण याविषयी सकारात्मक भुमिका घेऊन लवकरात लवकर निधीची तरतुद करून दिल्यास हातलाई तलावातील संगीत कारंजे लवकरात लवकर चालु होऊ शकेल व पर्यटनाचे एक आकर्षण होऊ शकेल, तुळजापूर पर्यंत येणारे लाखो पर्यटक हे ठिकाण पाहण्यासाठी उस्मानाबाद पर्यंत येऊ शकतील व एकंदरीतच जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांना भेटी देऊ शकतील तरी आपण व्यक्तिशः लक्ष घालुन निधीची तरतुद करुन सदरील काम लवकरात लवकर पुर्ण केले जाईल यासाठी योग्य ती कारवाई करावी,असे लेखी निवेदन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना चर्चा करुन देण्यात आले, निवेदन दिले,

यावेळी पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे,डॉ.अभय शहापुरकर,गणेश रानबा वाघमारे,बाबा गुळिग,धर्मवीर कदम,संजय गजधने अन्य इतर उपस्थित होते.


 
Top