लोहारा /प्रतिनिधी

आमदार विक्रम काळे यांनी लोहारा तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन  शाळा, शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्या  जाणून घेऊन येत्या काळात दूर करण्याचेही आश्वासन दिले.

 कै.भीमराव भीमराव नाईक आश्रम शाळा होळी, महात्मा गांधी विद्यालय होळी, शरद पवार हायस्कूल राजेगाव, श्री शांतेश्वर विद्यालय सास्तूर, बालाजी विद्यालय तावशी गड, छत्रपती शिवाजी विद्यालय सालेगाव, जय हनुमान विद्यालय तोरंबा, जि प प्रशाला धानोरी, भारत विद्यालय माकणी, सरस्वती विद्यालय माकणी, बी एस एस महाविद्यालय माकणी, निवासी अपंग शाळा सास्तुर, राजीव गांधी विद्यालय खेड, भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा वसंतदादा पाटील हायस्कूल लोहारा, नेताजी सुभाष चंद्र बोस जुनियर कॉलेज लोहारा, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय लोहारा,इत्यादी लोहारा तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना  भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत 

राष्ट्रवादी शिक्षक संघटना लोहारा तालुकाध्यक्ष जी.डी.मैंदाड, एम.टी भोसले, बी‌.एस.स्वामी, एस.एस‌.पवार, अशोक साठे, बालाजी पाटील, इ. उपस्थित होते. यानंतर वसंतदादा पाटील हायस्कूल लोहारा या ठिकाणी लोहारा तालुका शिक्षक दरबार संपन्न झाला. शिक्षकांनी आमदार विक्रम काळे यांच्यासमोर  विविध समस्या मांडल्या.

जुनी पेन्शन योजना सम्यक समितीचा अहवाल सकारात्मक आल्यास शिक्षकांना मिळवून देणारच असे सांगितले. यावेळी तालुक्‍यातील विविध शाळांना ग्रंथालयासाठी पुस्तके देणार, कोरोना झालेल्या शिक्षकांची दोन लाखापर्यंतची  मेडिकल बिले जिल्हा स्तरावरच मंजूर करण्याचे अधिकार शासनाकडून मंजूर करून घेतले, शालेय अनुदान, आणि विनाअनुदानित शाळांचा आणि टप्प्यावर असणाऱ्या शाळांना अनुदान वाढवून देण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करण्याचे आश्वासन उपस्थित सर्वांना आमदार यांनी दिले. या शिक्षक दरबारासाठी भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश जावळे पाटील, वसंतदादा पाटील हायस्कूल व नेताजी सुभाषचंद्र बोस ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या यु.व्हि.पाटील, प्रा. अंकुश नाडे महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य राष्ट्रवादी पक्ष, शंकराव जावळे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य विनायकराव पाटील, बालाजी इतबारे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघटना उस्मानाबाद, आयुब अब्दुल शेख, दत्ता जावळे पाटील, अंकुश शिंदे, इ.मान्यवरांच्या उपस्थित शिक्षक दरबार संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सुनिल बहिरे यांनी केले तर आभार  प्रा.गायकवाड पी.के.यांनी मानले. शिक्षक दरबारासाठी  भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्था संकुलातील प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच तालूक्यातील शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top