उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरात झालेले दरोडे व वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील पोलिस अधीक्षक निवा जैन व अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची शहरवासीयांसह भेट घेऊन चर्चा केली. या दरम्यान पोलिस पिकेट पोस्ट, रात्री ड्रोनद्वारे पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या.

शहरात चोरीच्या घटना घडत असून नागरिक दरोड्याच्या भीतीने रात्र जागून काढत आहेत. नुकत्याच घटना घडलेल्या कर्मवीर भाऊराव नगर, पोस्ट कॉलनी व गणेशनगर येथील घटनास्थळी भेट देऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना सुचवून तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. मोक्याच्या ठिकाणी वाहन तपासणीसाठी पोलिस पिकेट पोस्ट सुरु करणे, पोलिस पॅट्रोलिंगची वारंवारता वाढविणे, रात्री ड्रोन कॅमेराचा वापर सुरू करणे, नगरपालिकेमार्फत आवश्यक ठिकाणी दिवे लावून अंधारातील भाग प्रकाशमान करणे आदी सूचना आमदार पाटील यांनी केली. शहरातील सीसीटीव्ही बसविण्याचा विषय अनेक वर्षांपासून लालफितीच्या कारभारात गुरफटत पडला असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

येथील घटनास्थळी भेट देऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना सुचवून तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. मोक्याच्या ठिकाणी वाहन तपासणीसाठी पोलिस पिकेट पोस्ट सुरु करणे, पोलिस पॅट्रोलिंगची वारंवारता वाढविणे, रात्री ड्रोन कॅमेराचा वापर सुरू करणे, नगरपालिकेमार्फत आवश्यक ठिकाणी दिवे लावून अंधारातील भाग प्रकाशमान करणे आदी सूचना आमदार पाटील यांनी केली. शहरातील सीसीटीव्ही बसविण्याचा विषय अनेक वर्षांपासून लालफितीच्या कारभारात गुरफटत पडला असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

 
Top