तुळजापूर/प्रतिनिधी - 

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील  रक्तपेढीचे उपकेंद्र  गेली अनेक वर्षा पासुन बंद आहे. यामुळे   रक्तासाठी रुग्णांना बाहेर गावाहुन रक्त आणण्यासाठी जावे लागत आहे.  त्यामुळे रक्तपेढीचे उपकेंद्र येथे सुरु करुन तालुक्यातील  रुग्णांना  दिलासा देण्याची मागणी होत आहे.

  उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार प्रभारी  डाँ चंचला बोडके  यांच्याकडे होता. त्या उस्मानाबादहुन येजा करुन येथील कारभार पाहत होत्या त्यांच्या कार्यकाळात ही हे केंद्र बंदच होते. अशा निष्क्रिय अधिकारी वर्गामुळे त्यांच्या निष्क्रिय कारभाराचा फटका अनेक रुग्णांना बसला   हे केंद्र चालु ठेवण्याबाबतीत काहीही केले नाही  तुळजापूर येथे रक्तपेढीचे उपकेंद्र सुरू करण्यात आले  होते. परंतु सदरील रक्तपेढीचे उपकेंद्र अनेक वर्षापासून बंद आहे त्यामुळे अनेक रुग्णांना रक्तासाठी अडचणी निर्माण होत आहेत 

    तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना  रक्त मिळवण्यासाठी सोलापूर उस्मानाबाद या ठिकाणी धावपळ करावी लागत आहे. तुळजापूर तालुक्यासाठी आठवड्याला किमान  १० रक्त बॅग लागते  त्यासाठी तुळजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथील उपकेंद्र सुरू करावे जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही .हे उपकेंद्र चालु न केल्या प्रकरणी तात्कालीन संबंधित वैद्यकीय अधिकारीस जाब विचारुन ते यात दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


 
Top