उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद  शहरातील आचलेरकर कॉम्प्लेक्स मधील जयोस्तु प्रतिष्ठाण कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती दिना निमित्त अभिवादन करण्यात आले.  प्रमुख पाहुणे कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी स्वातंत्र्य लढ्यात सावरकर यांच्या योगदानाची प्रेरणा घेऊन राष्ट्रभक्ती जागृत ठेवावी असे आवाहन केले.

यावेळी शरद वडगावकर, अभिजीत रोधंवे , अक्षय कुलकर्णी , सुजित आचलेरकर, शेखर वडगावकर,पंकज कुलकर्णी, विक्रांत जोशी, पंकज कुलकर्णी, अनिरुद्ध जवळेकर उपस्थित होते.


 
Top