उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाव तिथे राष्ट्रवादी या प्रांत अध्यक्ष जयंत पाटील  यांच्या संकल्पनेतून     टाकळी बेंबळी  या गावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक िजल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा यांच्या उपस्थित संपन्न झाली.

यावेळी  राज्यांमध्य े राष्ट्रवादी काँग्रेस  पक्ष  ज्या पद्धतीने  काम करत आहे. त्या सर्व विकास कामांचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावागावात आणखीन मजबूत कसा होईल या दृष्टिकोनातून हा संवाद साधण्यात आला . नागरिकांनी महाविकासआघाडी कडून होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा ,आदरणीय सुप्रियाताई ,   जयंत पाटील   ,  हसन मुश्रीफ  ,मुंडे साहेब, नवाब मलिक   यांच्या माध्यमातून विकास कामाला प्रचंड गती मिळत आहे हे असे नागरिकांनी सांगत आहेत. प्रत्येक गावांमध्ये शाखा ओपनिंग करण्याचा निर्धार सुद्धा या बैठकीत व्यक्त केला असल्याचे सलगर यांनी सांगितले. 

 
Top