तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील कै.राहूल उर्फ अभिजीत बालाजी बागल (३५) रा.तुळजापूर यांचे रविवार दिनांक ६ रोजी लग्न समारंभातुन परत येत असताना तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ राहुल हा स्कुटी सह   उसाचा ट्रँक्टर खाली जावुन त्यात तो ठार झाला.

या बाबतीत अधिक माहीती अशी की,  राहुल बागल हा आपल्या  (एम.एच 25 ए.डी.2343 ) या स्वकुटीवरुन लग्न सभारंभातुन परत येत असताना  उसाचा थांबलेल्या  ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली जावुन  त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यावर रविवारी सायंकाळी मसला खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई - वडील, पत्नी , भाऊ असा परिवार आहे.


 
Top