उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील मस्सा (खं) येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी आंदोलनस्थळी श्रद्धांजली अर्पण करून आंदोलन स्थगित करण्यात आले.

  मस्सा येथील शेतकऱ्यांच्या सातबारावर प्रशासनाने 40 कोटी रुपयांचा बोजा अनधिकृतपणे चढलेला आहे मेघा कंपनीला कंपनीला महसूल प्रशासनाने 40 कोटींचा दंड ठोठावला होता . कंपनीने दंडाची रक्कम न भरल्यामुळे प्रशासनाने 40 कोटीचा बोजा शेतकर्‍यांच्या सातबारावर  टाकला आहे  शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि. 7 फेब्रुवारी) रोजी मसा येथे कळंब -येरमाळा रोड वर रस्ता रोको करण्यात येणार होता परंतु भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करून बुधवार (दि 9 फेब्रु) रोजी आंदोलन घेण्याचे जाहीर करण्यात आले.

आंदोलन करण्यासाठी आंदोलनस्थळी दुधगावकर व आंदोलन महिला शेतकरी व शेतकरी जमा झाल्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस  महिला शेतकरी यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.    यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष विक्रम वरपे, मा.सरपंच विष्णू बांगर, गणपत थोरात,आबासाहेब आडसूळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शाखाध्यक्ष,अनंत वरपे, प्रा.तुषार वाघमारे, प्रा रंजीत वरपे,नवनाथ शिंदे ,प्रा.अनंत शिंगोटे , नेमिनाथ इंगोले, बीजेकराम वरपे, बाळासाहेब वरपे, फुलचंद पाटील, किसन वरपे ,गणेश वरपे किरण तांदळे, नाना भाऊ वरपे ,नाना थोरात, सचिन वरपे, बताशा वरपे ,विकास वरपे, सोमनाथ  वरपे, अण्णासाहेब वरपे, मोतीचंद वरपे महिला शेतकरी ललिता वरपे,निता वरपे ,भाग्यश्री वरपे, वैजंताबाई वरपे, कावेरीबाई वरपे, राजूबाई वरपे, मिराबाई वरपे ,आशाबाई वरपे,वच्‍छलाबाई वरपे, स्वाती वरपे, इंदुबाई वरपे व ग्रामस्थांनी यावेळी गर्दी केली होती    

  कार्यक्रमस्थळी पोलीस कर्मचारी. व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते शेवटी राष्ट्रगीताने आदरांजलीचा  कार्यक्रम समाप्त झाला.

 
Top