उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील जनाई मंगल कार्यालयात कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम दिपप्रज्वलनासह कुसुमाग्रज, महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे खासदार ओम राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर , दत्ता बंडगर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ . जयप्रकाश घुमटकर, सोलापूर जिल्हाध्यक्षा डॉ. रंजनी दळवी , डॉ. वळसंगकर, संमेलन प्रमुख सिद्धेश्वर कोळी , जेष्ठ कवी मधुकर हुजरे,उस्मानाबाद जिल्हा भैरवनाथ कानडे, शहराध्यक्ष बाळासाहेब तिंबोणे , उस्मानाबाद जिल्हा संस्कार भारती जिल्हाप्रमुख श्यामसुंदर भन्साळी , शेषनाथ वाघ यांचे हस्ते करण्यात आले. 

दरम्यान त्यानंतर राज्यभरातून आलेल्या कवींनी एका हुन दर्जेदार कवितेचे सादरणीकरण करण्यात आले प्रथम सत्रात राज्य स्तरीय पुरस्कार कवींनीचा सन्मानपत्र ,शाल, पुस्तके , स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते देऊन वितरण करण्यात आले . नागपूर ते रत्नागिरीहून आलेल्या कवीने दुसऱ्या सत्रात अधिक प्रभावी कविता सादरणीकरण करण्यात आले. दुसऱ्या सत्राच्या कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे साहित्य युवराज नळे, जेष्ठ कवी राजेंद्र अत्रे, राज्य कार्यकारिणी सदस्य मधुरा कर्वे ,अर्चना अंबुरे, हे होते. या संमेलनाच्या नियोजनासाठी प्रभाकर चोराखळी कर , दिपक केंगार, सार्थकी वाघ सत्यहरी वाघ यांनी संमलेन यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले . सुत्र संचालन मधुरा कर्वे भावगंधा, राजेंद्र माळी ,आभार शेषनाथ वाघ यांनी मानले .


 
Top