उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुका खरेदी विक्री संघाचा निवडणुकीत महाविकास आघाडीने १० जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. तर भाजप प्रणित आघाडीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना हा जोरदार धक्का मानला जात आहे. दरम्यान, जिल्हा बँकेपाठोपाठ आणखी एका सहकारी संस्थेवर वर्चस्व मिळवत महाविकास आघाडी आगामी राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत.

तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शाम पवार, शहरप्रमुख सुधीर कदम, अमर चोपदार आदींनी परिश्रम घेतले. शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मतदान पार पडले. यावेळी एकूण ६४४ पैकी ३५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सोसायटी मतदारसंघांत एकूण ५५ पैकी ५४ मतदारांनी मतदान केले. मतदानानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक बी. ए. शिंदे यांनी काम पाहिले तर त्यांना उमेश भोपळे, सचिन शिंदे आदींनी सहकार्य केले. 

 
Top