तुळजापूर/ प्रतिनिधी- 

तुलजापूर तालुक्यातंर्गत असलेल्या साखर कारखान्यातील वजन काट्याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार तहसिलदार यांनी  गठीत केलेल्या तालुकास्तरीय पथकात शेतकरी प्रतिनिधी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष  धनाजी  तानाजीराव पेंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 साखर आयुक्त पुणे यांनी साखर कारखान्यातील वजनकाठी तपासणी  बाबतीत कळवले होते. त्या अनुषंगाने  तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी  आदेशाने  तालुकास्तरावरील भरारी पथकातील शेतकरी प्रतिनिधी धनाजी तानाजीराव पैदे, जिल्हा उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना नियुक्त शेतकरी प्रतिनिधी यांनी मा जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी गठीत केलेल्या पथकासमवेत या तालुका कार्यक्षेत्रात येणाऱ्या साखर कारखान्याचे वजनमापाची दर १५ दिवसातून अचानक तपासणी करून वेळोवेळी केलेल्या तपासणीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे दिलेल्या निवड पञात म्हटले आहे.


 
Top