तुळजापूर / प्रतिनिधी-

 अचानक लागलेल्या आगीत नुकतेच लग्न झालेल्या जोडप्याचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना शहरातील वासुदेव गल्ली भागात बुधवारी (दि. २) सकाळी ६.३० च्या सुमारास घडली. यावेळी अग्नीशमन दलाने शिताफीने आग विझवली. दरम्यान आगीचे कारण समजू शकले नाही. अकबर नजीर शेख यांच्या वासुदेव गल्ली भागातील पत्र्याया शेडला अचानक आग लागली. या आगीत अकबर शेख यांच्या दोन महिन्या पूर्वी लग्न झालेल्या मुलाचे कपाट, दिवाण, फ्रीज, टीव्ही आदी सर्व साहित्य जळून खाक झाले.

 
Top