तुळजापूर / प्रतिनिधी-

कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन तुळजापूर येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने संस्थेच्या वतीने आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी संस्थेच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.  संस्थेचे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे २१ वे वर्ष आहे संस्थेने आजवर अनेक रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून दिले आहे आजच्या या रक्तदान शिबिरा मध्ये ७१ जणांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा मजूर संघाचे चेअरमन नारायण नन्नवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे व्हा चेअरमन श्रीकांत भोजने, सचिव सज्जन जाधव, संचालक पंकज अग्रवाल, राजेंद्र माळी, संजय व्हटकर, संतोष इंगळ, श्रीकांत देशमाने, शिवाजी गायकवाड यांच्यासह संस्थेचे कर्मचारी संक्षेप ठेव प्रतिनिधी सभासद खातेदार बहुसंख्य संख्येने हजर होते. 

शिबिरास सोलापूर रक्तपेढीचे सहकारी लाभले शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अभिजित म्हेत्रे अश्विनी तांबे, सचिन शिंदे, सुनील शेरेकर, तानाजी फुलसुंदर, भागवत गुंड,  जावेद शेख,  श्रीनिवास मुळे, गणेश ठेले,  अशपाक सय्यद , गणेश खारे यांनी परिश्रम घेतले


 
Top