तुळजापूर / प्रतिनिधी-

 शहरातील  भारतीय जनता युवा मोर्चाच्या  पहिल्या शाखेचे उद्घाटन आमदार  राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तसेच युवा नेते विनोद   गंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

 तुळजापूर शहरातील कमान वेस  येथे भारतीय जनता युवा मोर्चाची पहिला शाखा काढण्यात आली, यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा शहराध्यक्ष राजेश्वर  कदम यांनी युवकांचे संघटन करून नियोजन केले, शाखा अध्यक्ष रत्नदिप लोंढे, उपाध्यक्ष पवन कदम, सचिव विशाल झाडपिडे व सदस्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती तुळजापूर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद  कंदले, जिल्हा सरचिटणीस   गुलचंद   व्यवहारे, मा.नगरसेवक अभिजित कदम,इंद्रजित साळुंके,राहुल कदम ,राम डोंगरे ,विनायक बर्वे ,तुषार पेंदे, अर्जुन परदेशी ,आकाश डावकरे, सरफराज शेख ,किसन पवार, नाना पेंदे, सार्थक लोंढे व सहकारी उपस्थित होते.


 
Top