तुळजापूर / प्रतिनिधी-

 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून  व मराठवाडा प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हयात  “विद्यार्थ्यांचा जाहीरनामा” अभियान राबवणार असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष दुर्गश सांळुके  यांनी दिली.

 या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे, पदाधिकारी राज्यातील व देशातील, विद्यार्थी- युवक उस्मानाबाद जिल्हा  ग्रामीण व शहरी विकास, शिक्षण, उद्योजकता, रोजगार,  आदी विषयात काम करणारी तज्ञ मंडळी, पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत, साहित्यिक, प्रशासक, व्यवसायिक व इतर मान्यवरांशी चर्चा करून मार्गदर्शन घेणार आहेत. सबंध राज्यभर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाकडून व त्यांच्या पालकांकडून सूचना मागविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 

या माध्यमातून आलेल्या सूचनांचे एकत्रीकरण  जिल्ह्यामधून/शहरामधून आलेल्या राज्य पातळीवरील सूचना विद्यार्थी प्रदेश कार्यालयाला पाठवून प्रदेश पातळीवर राज्यभरातून आलेल्या सूचनांचे एकत्रीत करून राज्यासाठीचा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होत विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात सुचना पाठवण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून करण्यात आले आहे.


 
Top