उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बालकांच्या मोफत आणि शक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यायानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना विनाअनुदानित,स्वयंअर्थसहायित्त शाळांमध्ये 25 टक्के प्रवेशाची ऑनलाईन पध्दतीने शैक्षिणिक वर्ष 2022-2023 साठी प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2022 पासून जिल्हयात सुरु होणार आहे. त्याबाबतचे सुधारित संभाव्य वेळापत्रक  जाहिर करण्यात आले आहे. पात्र पाल्यांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. अरविंद मोहरे यांनी केले आहे.

आरटीई प्रवेशपात्र शाळांच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ शाळा रजिस्ट्रशेन करून घ्यावे.यावर्षी नव्याने शासन परवानगी मिळालेल्या 25 टक्क्यांच्या शाळांनी रजिस्ट्रेशन करू नये आणि गटशिक्षणधिकारी यांनी पडताळणी करून घ्यावी.पालकांनी दि.16 फेब्रुवारी 2022 पासून प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज rte 25 admission.Maharashtra.gov.in किंवा Student. Maharashtra.gov.in या वेब वरून भरावे,लॉटरी पहिली सोडत दि.8 मार्च 2022 ते 9 मार्च 2022 या कालावधीत होणार आहे.यावर्षी एकच लॉटरी काढण्यात येणार आहे. शाळेच्या रिक्त जागेच्या संख्ये इतकीच प्रतिक्षा यादी राहणार आहे.

पालकांनी अर्जामध्ये अचूक आणि खरी माहिती भरावी.पालकांना ऑनलाईन प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त होताच अलॉटमेंट लेटर पालकांच्या लॉगइन वरून काढून स्वत: प्रत घेऊन शाळेमध्ये दि.10 मार्च 2022 ते 31 मार्च 2022 या कालावधीत जाऊन अभिलेखाची तपासणी करून घ्यावी आणि  शाळेत प्रवेश घ्यावा.प्रतिक्षा यादीतील प्रवेशाचा पहिला टप्पा  दि.  1 ते 7 एप्रिल 2022, प्रतिक्षा यादीतील दुसरा प्रवेशाचा टप्पा  11 एप्रिल 2022, प्रतिक्षा यादीतील प्रवेशाचा तिसरा टप्पा दि.25  ते 29 एप्रिल 2022, प्रतिक्षा यादीतील प्रवेशाचा चौथा टप्पा  दि.2 ते 9 मे 2022 असणार आहे. वंचित गटामध्ये अनुसूचित जाती.अनुसूचित जमाती,वि.जा.(अ) भटक्या जमाती (ब),भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड),इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC), प्रवर्गाचा आणि दिव्यांग बालकांचा समावेश करण्यात आला आहे.शासनाने दि.17 मे 2018 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने एच.आय.व्ही. बांधित,एच.आय.व्ही प्रभावीत बालकांचाही समावेश करण्यात आला आहे.

दुर्बल गटामध्ये ज्या बालकांच्या पालकांचे,ज्या बालकांचे पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न एक लाखा रुपयांच्या आता आहे. अशा बालकांचा समावेश होत आहे.निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड,ड्रार्व्हीग लायसन्स,वीज,टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक/घरपट्टी, राष्ट्रीयकृत बॅकचे पासबूक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आदी यापैकी कोणताही एक पुरावा ग्राहय धरण्यात येईल. यापैकी एखादा पुरावा उपलब्ध नसेल तरच दुय्यम निबंधक कार्यालयाचा एक वर्षाचा नोंदणीकृत भाडे करारनामा,जन्म तारखेचा पुरावा ग्राहय धरला जाईल.

वंचित संवर्गासाठी  जातीचे प्रमाणपत्र दुर्बल संवर्गासाठी:- पालकांचे  2020-21 किंवा 2021-22 वर्षाचा उत्पन्नाचा तहसीदार यांचा दाखला किंवा पगारपत्रकाचा कंपनीचा दाखला आवश्यक आहे.विधवा,घटस्फोटीत आणि आई अथवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय पालकत्व म्हणून असेल तर त्यांचा पुरावा जोडावा. आरटीई मोफत प्रवेशाचा लाभ जिल्हयातील पालकांनी आपल्या पाल्यासाठी घ्यावा, या संदर्भात काही अडचणी आल्यास तालुक्याचे गटशिक्षणधिकारी किंवा  जि.प. उस्मानाबाद येथील  प्राथमिक  शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन डॉ. मोहरे  यांनी केले आहे


 
Top