उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील सांजा येथील कृषिपंपांना विद्युतपुरवठ्याचे नियम व वेळेत बदल करण्याची मागणी सांजा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

  निवेदनात म्हटले आहे की, पिकांना पाणी देण्यासाठी महावितरणकडून रात्री ९ ते पहाटे ५ दरम्यान वीज पुरवठा करण्यात येतो. ही वेळ शेतकऱ्यांसाठी अडचणीची असून जीवितास धोका संभवू शकतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेत बदल करुन दिवसा ३ ते ४ तास विद्युत पुरवठा करावा. निवेदनावर सांजा येथील ५२ शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत. निवेदन देतेवेळी सांजा येथील माजी सरपंच संजय सूर्यवंशी, नागेश हंगरगेकर, राकेश कचरे, बालाजी सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


 
Top