परंडा / प्रतिनिधी-

 परंडा‎ उद्धव ठाकरे सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्री नवाब‎ मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या ‎ ‎ मागणीसाठी भाजपच्या वतीने येथील तहसील‎ कार्यालयात निवेदन देण्यात आले.‎ 

युवा नेते समरजितसिंह ठाकूर व तालुकाध्यक्ष‎ राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन‎ करण्यात आले. याप्रसंगी आघाडी सरकारच्या विरोधात ‎ ‎ घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजप अल्पसंख्याक‎ सेलचे प्रदेश चिटणीस अॅड. जहीर चौधरी, विठ्ठल‎ तिपाले, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस डॉ.‎ तानाजी वाघमारे, साहेबराव पाडुळे, तुकाराम हजारे,‎ महादेव बारस्कर, विवेक शिंदे, राहूल जगताप, सारंग‎ घोगरे, सुभाष लटके, दत्ता ठाकरे, रेवणनाथ आरे, सुदाम‎ ‎ कापसे, श्रीमंत शेळके, सुग्रीव कदम, धनाजी पुरी,‎ शिवाजी लटके, तुकाराम शिंदे, नागेश शिंदे, किरण‎ देशमुख, युसूफ पठाण आदींसह भाजपचे कार्यकर्ते‎ उपस्थित होते.‎


 

 
Top