परंडा / प्रतिनिधी : -

हिंदू मुस्लीमांचे श्रद्धास्थान असलेल्या परंडा येथिल हजरत ख्वाजा बद्रोद्दीन शाहिद यांचा ७०२ वा ऊरुस गुरुवार दि.१०फेब्रुवारी रोजी पारंपारीक पध्दतीने विविध कार्यक्रमाने साधे पणाने साजरा करन्यात आला.     दि.१० फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६ वाजता येथील तहसिलदार रेणूकादास देवणीकर यांच्या डोक्यावर मानाची फुलाची चादर घोडयापर्यंत नेहन्यात आली व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमा नुसार ऊरुस मिरवणूकीचा  शुभारंभ करन्यात आला .

      या वेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील , कृषी व पशू सवंर्धन सभापती दत्ता साळुंके , नगर अध्यक्ष जाकीर सौदागर , अॅड रणजित मोटे , महाराष्ट्र मुस्लीम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर , आरपी आयचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे , नायब तहसिलदार पाडूळे , नायब तहसिलदार सुजित वाबळे , ॲड नुरोद्दीन चौधरी,वाजीद दखनी ,ॲड. जहिर चौधरी , मतीन जिनेरी , मेघराज पाटील ,दर्गाह चे मुतवल्ली युनुस आलम सिद्दीकी, ईकबाल मुजावर , तोफीक मुजावर , रईस मुजावर , अजहर शेख ,याच्या सह आदि मान्यवर उपस्थित होते.

फिरोज ऊर्फ मस्तान शेख यांच्या कडून आंबेडकर चौकात भावीकासाठी पाण्याची व्यावस्था करून नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करन्यात आला.  तहसिल कार्यालया पासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक ,हजरत टिपू सुलतान चौक , मंडई पेठ या मार्गावरून मिरवणूक रात्री ९ वाजता दर्गाह येथे पोहोचली यानंतर फातेहा खानी होऊन महाप्रसाद वाटप करन्यात आले.

उरुसानिमित्त पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस बंदोबस्त चोक ठेवण्यात  आला होता .  तहसिलदार देवणीकर , पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे, सहायक पोलिस निरिक्षक ससाने यांनी दर्गाह येथे हजर राहुल बंदोबस्ताची पाहणी केली.कोरोनाचे सावट असल्या मुळे  उरूस अत्यंत साधेपणाने साजरा करन्यात आला.

   उरूस कमेटी चे अध्यक्ष मालिक मुजावर उपाध्यक्ष सलीम मुजावर यांच्या सह  डॉ.अब्बास मुजावर , रफीक मुजावर , एजाज मुजावर , फिरोज मुजावर , शाबाज मुजावर ,अरबाज मुजावर , मुशरफ मुजावर यांनी परिश्रम घेतले.


 
Top