उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बळीराम बिरुदेव शिंपले  (60 ) यांचे गुरुवार दि.28 जानेवारी  रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.    त्यांचे मागील पंधरा दिवसापूर्वी मणक्याचे ऑपरेशन केले होते त्यामुळे ते आजारी होते ते गेली तीस एक वर्षापासून सांप्रदायिक क्षेत्रांमध्ये गायन , पेटी वादन कला त्यांना अवगत होती ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते त्यांचा स्वभाव अतिशय चांगला सर्वां बरोबर मिळून मिसळून राहणारा होता. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी ,तीन मुले ,सुना ,नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे .त्यांच्या निधनाने रुईभर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांचा अंत्यविधी त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक गावकरी होते.


 
Top