परंडा / प्रतिनिधी : -

 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक संभाजी धनवे यांना परंडा तालुका युवा पत्रकार संघ व कर्मवीर परिवार परंडा यांनी आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा मध्ये आमदार रोहित पवार माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आमदार राहुल मोटे यांच्या उपस्थितीमध्ये  सन्मानपत्र ट्रॉफी देऊन नाट्यशास्त्र पुरस्काराने सन्मानित केले त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांनी महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 यावेळी आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ.महेशकुमार माने, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रकाश सरवदे, प्रा.डॉ.सचिन चव्हाण, प्रा. डॉ.अतुल हुंबे, प्रा. डॉ.विद्याधर नलवडे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक दत्ता मांगले ,कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब दिवाने आणि बाबासाहेब शिरसागर आदी प्राध्यापक कर्मचारी सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. विद्याधर नलवडे यांनी मानले.

 
Top