उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 श्री . नानासाहेब भानुदास भोसले यांची महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल मुलांच्या संघाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती करयात आलेली असल्याचे नियुक्तीपत्र श्री . शत्रुघ्न गोखले , आयोजक एड. होक समिती , महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी दिले असून सदर संघ हा दि . 03 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान इंदोर येथे होणाऱ्या 71 व्या राष्ट्रीय कुमार गट बास्केटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे .

 श्री नानासाहेब भोसले यांनी महाराष्ट्र राज्य बास्केबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा बास्केट बॉल असोसिएशनचे अध्यक्ष , पदाधिकारी व खेळाडूंनी अभिनंदन केले आहे .


 
Top