उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यमंत्री बच्चू कडू व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नाने राज्यातील दिव्यांगाची हेळसांड होऊ नये, याकरिता जिल्ह्याभरातील सर्व सर्व दिव्यांग व्यक्तीसाठी शासकीय रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक समाज कल्याण विभाग यांच्यावतीने तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी युडीआयडी कार्ड तपासणी व निदान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा जिल्ह्यात दिव्यांगानी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले आहे.

ही मोहिमेचे आयोजन भूम येथील ग्रामीण रुग्णालय येथे 12,13,14 व 17 जानेवारी रोजी, उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय येथे 19,20,21 व 24 जानेवारी रोजी, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे 27 28 29 जानेवारी, उपजिल्हारुग्णालय उमरगा येथे 1 व 2 फेब्रुवारी, ग्रामीण रुग्णालय लोहारा 3 व 4 फेब्रुवारी रोजी, उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे 7 8 9 फेब्रुवारी रोजी, ग्रामीण रुग्णालय वाशी येथे 11 व 14 फेब्रुवारी रोजी, उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे 18 21 व 22 फेब्रुवारी रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी या शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले आहे  तसेच तालुक्यात दिव्यांगाना अडचण आल्यास चित्रा शिंदे भूम, बाळासाहेब कसबे, बाबा भोईटे, जमीर शेख उस्मानाबाद, महेश माळी, महादेव चोपदार शशिकांत मुळे तुळजापूर, अजीम खजुरे, वासुदेव काशीद उमरगा, श्रीमंत गरड, महंमदअत्तर, अभिजित साळुंके लोहारा, गणेश शिंदे कळंब, हेमंत उंदरे, सुरज उंदरे वाशी ,नागनाथ पाटील, भारत नारनवरे परंडा यांच्याशी संपर्क करावा असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.


 
Top