उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सानेगुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत विजयी शिलेदार संचालकांचा सत्कार करण्यात आला़ उस्मानाबाद येथे शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात रविवारी (दि़९) हा सत्कार सोहळा संपन्न झाला़

उस्मानाबाद येथे जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने परंडा येथील सानेगुरूजी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला़ सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन रामकृष्ण मते तर शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, कार्यक्रमाचे आयोजक तथा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन एल़बी़ पडवळ, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, सानेगुरूजी शिक्षक पतसंस्थेचे नूतन चेअरमन ज्ञानेश्वर देवराम, संचालक जयदेव गंभीरे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ परंडा तालुक्यातील शिक्षकांची महत्वपुर्ण असलेल्या सोनेगुरूजी शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत शिक्षक संघ प्रणित पॅनलने सर्व ११ जागा जिंकून विजय मिळविल्याबद्दल नूतन संचालकांचा जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला़ यावेळी जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन शेषेराव राठोड, सचिव मोहन जगदाळे, किरण पवार, राहुल थोडसरे, प्रमोद हुग्गे, प्रशांत घुटे, दत्ता पवार, अमरसिंह गोरे, बाबासाहेब अंकुशे, बालाजी पडवळ, श्याम नवले, विक्रम लोमटे, उमेश भोसले आदी शिक्षक उपस्थित होते़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन  श्री पडवळ, सुत्रसंचालन माजी चेअरमन हणुमंत पडवळ तर आभार व्हा़ चेअरमन श्री़ राठोड यांनी व्यक्त केले़

यांचा केला सत्कार

नूतन चेअरमन ज्ञानेश्वर देवराम, व्हाईस चेअरमन अप्पासाहेब भोंग, सचिव ेदेवान पाटील, संचालक जयदेव गंभीरे, धनाजी खरत, सचिव केमदारने, शिवाजी शिंदे, हेमंत मस्के, सर्जेराव ठोकळ, भाऊसाहेब जगताप, महेश राजेनिंबाळकर, जगन्नाथ साठे, श्रीमंत चौरे, भिवाजी पंडीत, नितीन गायकवाड, रविंद्र कापसे यांचा सत्कार करण्यात आला़


 
Top