उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन बुधवार दि.०५ जानेवारी २०२२ रोजी, देवसिंगा (तुळ) ता.तुळजापुर येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात देवसिंगा (तुळ) व परिसरातील सर्व वयोगटातील ४१५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन मा.उपसरपंच रामराव जाधव व डॉ.अजित निळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे मदन लाल जाधव, गीरीधर जाधव, उल्हास जाधव, अण्णासाहेब भोसले, विश्वनाथ जाधव, रुपेश भोसले, यांच्यासह कार्यकर्ते, आशा कार्यकर्त्या कविता वाघमारे व अंगणवाडी सेविका अनिता भगत व ग्रामस्थ व कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थीत होते. तसेच मुख्याध्यापक फुल सुंदर सरांनी प्रस्ताविका केली. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.अंकित कुरकुटे, डॉ. शुभम शिंगटकर, डॉ. रोहीत कोळी, डॉ.स्वप्नील नायक, डॉ. परवीन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना  शिंदे ईत्यादींनी परीश्रम घेतले. 

 
Top