उमरगा / प्रतिनिधी - 

तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर  यांचा जन्मदिवस दर्पण दिन म्हणून गुरुवारी दि.०६ रोजी  साजरा करण्यात आला .

उमरगा तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने   येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आचार्य  बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन हा दर्पण दिन म्हणून  साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार देविसिंग राजपुत हे होते . आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले . यावेळी वृत्तपत्र विक्रेते रमेश बसगुंडे व  तानाजी घोडके यांचा सत्कार करण्यात आला . 

यावेळी मारुती कदम ,शंकर बिराजदार , अमोल पाटिल , युसुफ मुल्ला , शरद गायकवाड , शिवाजी गायकवाड , बालाजी माणिकवार , उमेश सुरवसे , माधव सूर्यवंशी , आदी पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले . 

यावेळी अंबादास जाधव , समिर सुतके , गोलप्पा कांबळे ,  विट्ठल चिकुंद्रे , लक्ष्मण पवार , निजगुण स्वामी , मल्लीनाथ सुपतगावे , संभाजी पाटिल , महादेव पाटिल , रोहित गुरव ,  आदीनाथ भालेराव , बालाजी गायकवाड , विश्वास सोनकांबळे , सिद्राम देशमुख , गुणवंत पवार , दत्ता नांगरे , अस्लम शेडमवाले , निजगुण स्वामी , नसरुद्दीन फकीर , तानाजी घोडके इबराहिम ईनामदार  आदी पत्रकार उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदिप भोसले यांनी तर  सुत्रसंचालन सुभाष जेवळे  व  आभार महेबुब पठाण यांनी मानले .

 
Top