उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम,2016 मध्ये महाविकास आघाडी सरकारने विवेकवादी सुधारणा केल्याबद्दल  महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय काँग्रेस पक्षाचे  उस्मानाबाद जिल्ह्यातील युवक व विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला व विधेयकाचे स्वागत केले. 

युवासेनेचे जिल्हा समन्वयक तथा सरपंच अॅड.संजय भोरे यांनी अधिनियमात ज्या विवेकवादी सुधारणा केल्या आहेत त्याबद्दल प्राध्यापक व विद्यार्थी यांना सखोल माहिती करून दिली.  यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अक्षय ढोबळे, एन.एस.यु.आय चे प्रदेश जनरल सेक्रेटरी रोहित थिटे, युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सौरभ देशमुख, युवासेना तालुका सहसंघटक व्यंकटेश कोळी, उपतालुका प्रमुख बापू थोरात, अक्षय नाईकवाडी आदींसह महाविकास आघाडी च्या युवा व विध्यार्थी आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top