उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील संस्कार वर्ग सत्संग सभागृह येथे जिल्हा संस्कार भारती समिती सहा अनिवार्य उत्सवापैकी भारत माता पुजन करण्यात या प्रसंगी प्रमुख अतिथी श्यामराव दहिटणकर संस्कार भारती जिल्हा पदाधिकारी श्यामसुंदर भन्साळी, सुरेश वाघमारे सुंभेकर, शेषनाथ वाघ, अर्चना अंबुरे, पुजा राठोड , पोलीस एकनाथ कुंडकर यांचे हस्ते भारत माता प्रतिमा पुजन करण्यात आले . मनोगत व्यक्त करताना श्यामराव दहिटणकर यांनी आपल्या राष्ट्र भक्ती हि फक्त १५ ऑगस्ट , २६ जानेवारी दिनापुरती मर्यादित न ठेवता अखंडीत असावी समाजातील गरजू घटकांना मदत करावी सामाजिक कार्य अविरतपणे करीत राहावे असे म्हणाले . विशाखा बागल, प्रतिक्षा जाधव, कल्याणी वाकुरे , सत्यहरी वाघ , अर्णव दहिटणकर, संस्कृती अंबुरे उपस्थित होते .

 

 
Top