कळंब / प्रतिनिधी-

 उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे मोठ्या उत्साहात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ जीवन वायदंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

या कार्यक्रमास आय. एम. ए. चे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे, सचिव डॉ सत्यप्रेम वारे, केटीएमपीए चे अध्यक्ष डॉ अभिजित जाधवर, डॉ सचिन पवार, डेंटल चे डॉ अभय मनगिरे,डॉ वर्षा कस्तूरकर, डॉ दिपक कुंकूलोळ, डॉ शितल कुंकूलोळ, डॉ अभिजित लोंढे, डॉ रमेश जाधवर, रुग्ण कल्याण समिती सदस्य श्री हर्षद आंबुरे व रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

या  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कळंब येथील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी कोरोना महामारी च्या दोन्ही ही लाटा रोखण्यासाठी मोफत आरोग्य सेवा देऊन शासनास बहुमोल सहकार्य केल्या बद्दल प्रशासनाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .यावेळी डॉ रामकृष्ण लोंढे,डॉ सत्यप्रेम वारे , डॉ अभिजित जाधवर, श्री हर्षद अंबुरे यांनी आपले विचार मांडले. यावेळी रुग्ण कल्याण समिती  बैठकीमध्ये ठरल्यानुसार सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी ड्रेस कोड परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली व प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ भक्ती गीते,डॉ स्वप्नील शिंदे, इन्चार्ज गोस्वामी, त्यांचे सहकारी व इतर अधिकारी-कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची 100% उपस्थित होती हे विशेष. तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसायिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 
Top