उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहर व परिसरातील किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना डायलेसिस ची सोय शहरातील सुविधा हॉस्पिटल येथे असून ती गेल्या महिनाभरापासून बंद होते, त्यामुळे रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल होत होते, सदरील बाब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन  काळे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चा धाराशिव चे तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी व शहराध्यक्ष सुजित साळुंखे यांनी सिव्हिल सर्जन धनंजय पाटील यांची भेट घेऊन नातेवाईक  व रुग्णांसमवेत सदरील प्रकाराची माहिती दिली. तसेच डायलेसिस ची सोय सिविल हॉस्पिटल मध्ये तीन टप्प्यामध्ये करण्याचे आवाहन केले तसेच सुविधा हॉस्पिटल येथील बंद असलेले डायलेसिस सुरू करण्यासाठीचे आदेश हॉस्पिटल मधील संबंधिताना द्यावेत,अशी विनंती केली यामुळे रुग्णांची हेळसांड होणार नाही व वेळेत त्यांचे डायलेसिस होईल. शहरातील खाजगी रुग्णालय पल्स हॉस्पिटल येथे डायलिसिस साठी लागणारी एक मशीन उपलब्ध आहे, परंतु तेथील हॉस्पिटल प्रशासन त्यांच्या मनमानी पद्धतीने फीस आकारत आहेत व डायलेसिस करण्यासाठी चार तास लागतात, परंतु जास्त पेशंट ठेवण्याच्या उद्देशाने एक ते दीड तास असे करत आहेत, याआधीही पण पल्स हॉस्पिटल बाबतीत खूप तक्रारी आलेल्या आहेत, त्यांच्यावर ही योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही ओम नाईकवाडी यांच्यामार्फत करण्यात आली.

 या सर्व तक्रारींची दखल घेत सिव्हिल सर्जन धनंजय पाटील यांनी डायलेसिस मशीन चालू करण्याचे आदेश दिले, त्यामुळे शहरातील तसेच परिसरातील रुग्णांचे हाल थांबले असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

 
Top