परंडा /प्रतिनिधी  - 

परंडा तालुक्यातील रोहकल येथे बुधवार दि .१२ रोजी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था , उस्मानाबाद व युरोपियन युनीयन प्रकल्प यांच्या वतीने एक दिवशीय शेळी पालन प्रशिक्षण संपन्न झाले . 

रोहकल येथील प्रकाश बनसोडे यांच्या बंदीस्त शेळीपालनास यावेळी भेट देण्यात आली . स्वयंम शिक्षण प्रयोगचे शेळी प्रशिक्षक अजय हराळे व राजेश शिनगारे यांनी शेळी पालणा विषयी महिलांना मार्गदर्शन केले . शेळ्याना देण्यात येणारा चारा , शेळी बांधणी साठी योग्य  निवारा , शेळ्यांना देण्यात येणारे लसिकरण , शेळी गाभण असताना घ्यायची काळजी , शेळी करडाचे संगोपण याविषयी अनमोल मार्गदर्शन शेळी प्रशिक्षक अजय हराळे यांनी दिले . शेळीपालन प्रशिक्षण स्वयंम शिक्षण प्रयोगचे उपमन्यु पाटील , जिल्हा समन्वयक किरण माने , सहाय्यक जिल्हा समन्वयिका सीमा सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले . प्रशिक्षणासाठी परंडा व भूम तालुक्यातील शेळी उत्पादक गटातील महिला सहभागी झाल्या होत्या. रोहकल येथील बंधिस्त शेळीपालन चालक प्रकाश बनसोडे यांनी ही महिलांना बंदीस्त शेळीपालनाविषयी महत्वाची माहिती दिली . प्रशिक्षणास स्वयंम शिक्षण प्रयोगच्या परंडा तालुका समन्वयक नौशाद शेख , भूम तालुका समन्वयक पल्लवी माने , लिडर अन्नपुर्णा ठोसर , जयश्री शेवाळे यांच्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 
Top