उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 योजना- उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापुर, कळंब, उमरगा, भूम, परांडा या ठिकाणी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना  2021-22 या वर्षे करावयाचे आहे.त्यासाठी पात्र इच्छुक लाभार्थीचे अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रती तालुका एक या प्रमाणे लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे.

 सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणिजनजाती क्षेत्र उपयोजनेतील जे लाभार्थी सध्यास्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत तसेच, ज्या लाभार्थ्यांकडे लघू अंडी उबवणुक यंत्र आहे. अशा लाभर्थ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. सदर योजनेचे मार्गदर्शक सूचना अर्जाचा नमुना आणि बंधपत्राचा नमुना पशुधन विकास अधिकारी  (वि) पंचायत समिती तुळजापुर, कळंब, उमरगा, भुम, परांडा यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

या योजनेचे अर्ज दिनांक दि. 12 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती तुळजापुर, कळंब, उमरगा, भूम, परांडा यांच्याकडे स्वीकारण्यात येतील.

 
Top