उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णय अन्वये  कोविड19च्या पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांना अर्थ सहाय करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अर्थ सहाय एक रक्कमी एकदाच पात्रलाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यास्तव  प्रयोगात्मक क्षेत्रातील एकल कलावंतं   यांचे अर्ज त्या त्या तालुक्याच्या तहसीलदांरमार्फत ही बातमी प्रसिध्द झाल्या पासून 10 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी यांच्याकडे   करावेत, असे आवाहन या संबधिच्या जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

 
Top