उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नाट्यगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृह नगर परिषद समोर उपहासात्मक आंदोलन करण्यात आले

मा.आमदार राणाजगजितसिंह पाटील  हे राज्यमंत्री असतांना उस्मानाबाद च्या नाटयगृहाकरिता ५ कोटी रुपये २००८ साली मंजुर करुन उद्घाटन २००९ साली आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. गेल्या पंचवार्षीक मध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष असल्यापासून ते आज तगायत पर्यंत नाटयगृह चालु करण्या करिता कुठलीली कार्यवाही झाली नाही. त्या नाटयगृहामध्ये अनेक कामे निविदा होऊन देखील अपूर्णच आहेत. नादुरुस्त व अपूर्ण असलेल्या नाटयगृह परिसरात सद्यस्थितीस तळीरामांचा अड्डा बनला आहे तसेच प्रवाशी वाहतुक करण्याचा वाहनांचा पार्कींग म्हणून वापर चालु आहे. मुख्याधिकारी यांची भेट घेऊन जाब विचारला असता नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी येत्या दोन महिन्यात अपूर्ण कामे पूर्ण करु, मार्च अखेरपर्यंत पूर्ण करु असे आश्वासन दिले.

नाटयगृह आंदोलनाचा भाग म्हणून त्रिमुर्ती प्रॉडक्शन निर्मित ३ नाटकांचे प्रयोग ठेवण्यात आले होते. १) १ माणूस १२ भानगडी – दुपारी १२ ते ३, २) एका लग्नाची दुसरी गोष्ट – सांय ६ ते ९, ३) एकच प्याला- रात्री ९ ते १२.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष सुनिल काकडे, युवा मार्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, शहराध्यक्ष राहुल काकडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुजित साळुंके, नगरसेवक प्रविण पाठक, अभिजीत काकडे, दाजीप्पा पवार, भाजपा ओबीसी उपाध्यक्ष लक्ष्मण माने, शेषेराव उंबरे, विनोद निंबाळकर, पंकज जाधव, अमोल राजे निंबाळकर, संदीप इंगळे, तसेच युवा मोर्चाचे ॲड.कुलदिपसिंह भोसले, प्रितम मुंडे,राहुल शिंदे, देवकन्या गाडे, विद्या माने, ओम नाईकवाडी, राज निकम, गणेश इंगळगी, गणेश देशमुख, ओमकार देशमुख, मेसा जानराव, विशाल पाटील, अक्षय भालेराव, ॲड.कुणाल व्हटकर, रोहीत देशमुख, प्रसाद मुंडे, अतुल चव्हाण, सागर दंडनाईक, गणेश मोरे, दादुस गुंड, अमित कदम, स्वप्नील नाईकवाडी, जगदीश जोशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.

 
Top