तुळजापूर / प्रतिनिधी :- 

 श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सव कालावधीत देविजींना सकाळी पाच वाजता सांयकाळी दोन असे प्रतिदिन सात सिंहासन पुजा करण्यात येणार आहे. श्रीतुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवराञोत्सव १० जानेवारी २०२२ पासुन आरंभ होणार असुन या उत्सवाची सांगता १७ जानेवारी २०२२रोजी शाकंभरी पोर्णिमा दिनी होणार आहे.

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवात मोठी गर्दी असल्याने श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवात स्थानिक देविजींचा कुलधर्मकुलाचार मोठ्या संखेने या पार्श्वभूमीवर शाकंभरी नवराञोत्सव कालावधीत देविजींना श्रीखंड दहीदुध सिंहासन पुजा केल्या जातात.या पार्श्वभूमीवर सध्या सिंहासन पुजे बाबतीत नियोजन सुरु झाले आहे.


 
Top