उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन सोमवार दि.०३ जानेवारी २०२२ रोजी, बाबानगर कळंब येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात नायगांव व परिसरातील सर्व वयोगटातील ४८० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उदघाटन विजेंद्र अण्णा चव्हाण (विश्वस्त) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे भाजपा तालुका प्रमुख अजित दादा पिंगळे, शहराध्यक्ष प्रशांत लोमटे, शिवाजी शेंडगे, माणिक बोंदर, संदिप बावीकर, सचिन जोशी, प्रशांत जोशी, दत्ता लोमटे, बापू गिरी, सचिन जाधवर, गोविंद गायकवाड यांच्यासह आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी कार्यकर्त्या व ग्रामस्थ व कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थीत होते. प्रास्तवीक प्रा. तुळशीराम उकीरडे यांनी केले. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.अंकित कुरकुटे, डॉ. शुभम शिंगटकर, डॉ. रोहीत कोळी, डॉ.स्वप्नील नायक, डॉ. परवीन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तेरणा जनसेवेच केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, नामदेव शेळके, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना  शिंदे ईत्यादींनी परीश्रम घेतले.


 
Top