उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नोकरभरतीत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विरोध करा, जिल्हयातील युवा कार्यकर्त्यांच्या वतीने या सर्व गोष्टीबाबत मनात असलेली खदखद व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे होते ,त्यासाठी कांही युवकांच्या पुढाकाराने  जिल्हयातील तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या सर्व प्रकारच्या विरोधात आवाज उठविन्याचे ठरविले आहे,सतत स्पर्धा परीक्षा घोटाळ्याने त्रस्त असलेल्या युवकांना भाजपचे जिल्हाध्यक्ष  काळे यांचे मार्गदर्शन केले.

जर आपण आता संघर्ष केलात तर येणाऱ्या काळात या सर्व स्पर्धापरिक्षा पारदर्शक मार्गाने होतील आणि तसेच आतापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धा परिक्षा व नोकरीच्या घोटाळ्यातील खऱ्या सुत्रधार आणि दोशींवर कडक कारवाई करण्यासाठी SIT नेमण्यात यावे . सातत्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ,स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी शासकीय  विश्राम गृह धाराशिव येथे सविस्तर चर्चा केली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या , त्यांना संविस्तर मार्गदर्शन केले.

     याप्रसंगी सर्व परिक्षार्थी व  यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, तसेच ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले ,प्रसाद राजमाने आदि उपस्थित होते.


 
Top