कळंब  / प्रतिनिधी-

  तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने भाजप पुरस्कृत पॅनलवर विश्वास व्यक्त करत १३ पैकी ९ जागा जिंकून दिल्या होत्या. परंतु शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी सदस्यांची दिशाभूल करून यासर्वांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी प्रवृत्त केले होते.

प्रवेश करून घेत असताना सांगितलेल्या बाबी असत्य असल्याचे लक्षात आल्यानंतर अवघ्या २१ दिवसांतच सरपंच सौ.केवळबाई नारायण शिंदे, सदस्य श्रीमती जयश्री शहाजी गायकवाड, श्री.संदीपान झाडके, श्री.हनुमंत रितापुरे, सौ.प्रियंका बाळासाहेब भराडे, सौ.सीताबाई विठ्ठल बनसोडे, श्री.प्रशांत प्रताप कांबळे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला.

गावाचा विकास केवळ भारतीय जनता पक्षच करू शकतो हे या निर्णयाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष  अजित पिंगळे, जिल्हा बँकेचे माजी संचालक  भागचंद बागरेचा,  अरुण चौधरी, भागवत झाडके,  अमोल शिंदे,  अशोक झाडके,  पांडुरंग कानडे,  अतुल रितापुरे,  अर्जुन शिंदे,  विठ्ठल बनसोडे, अभिजित झाडके, ामभाऊ माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 


 
Top