परांडा / प्रतिनिधी :- शाळा महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थीनीने उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे घेतलेल्या शिक्षणातून स्वतःची आणि समाजाची प्रगती झाली पाहिजे असे मत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे  महाविद्यालय परंडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युवती मंचच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ दीपा सावळे यांनी व्यक्त केले.

 महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच दिनांक 3 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान जिजाऊ सावित्री शिवजन्मोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्राचार्या डॉ दीपा सावळे उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युवती मंचचे चेअरमन डॉ शहाजी चंदनशिवे उपस्थित होते. 

या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रा अनिसा शेख, प्रा डॉ वैशाली थोरात, प्रा कीर्ती पायगन ,प्रा प्रतिभा माने, प्रा सूर्यवंशी एन बी, प्रा खरे आणि श्रीमती देशमुख पी एस उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.यावेळी शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस मध्ये नियुक्त केलेल्या सर्व युवती मंचच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले . कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी शुभम फरतडे, मयुरी रोकडे ,जेतवनी मिसाळ आणि आरती नलवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले.

 याप्रसंगी प्रा डॉ महेशकुमार माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ दीपा सावळे यांनी केला . अध्यक्ष समारोप करताना पुढे म्हणाल्या की सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये परिवर्तन करून एक आदर्श समाज निर्माण केला म्हणून आज मोठ्या पदावर महिला कार्यरत आहेत.सर्व स्तरावरील महिलांची प्रगती झाली.शेवटी कार्यक्रमाचे आभार कु दिप्ती पाटील हिने मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 
Top