तुळजापूर / प्रतिनिधी-

  तिर्थक्षेञ तुळजापूर  पिस्तूल प्रकरणी  आजपर्यत पाच जणांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन चार गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुस ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले आहे. 

 या बाबतीत अधिक माहीती अशी की   30 डिसेंबर 2021 रोजी पोलीस स्टेशन तुळजापुर येथे मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे मा . पोलीस निरीक्षक  आजिनाथ काशीद  यांचे आदेशाने आरोपी राजेंद्र सुरेश कांबळे  व एक विधिसंघर्ष बालक यांचेकडे अवैध शस्त्र असले बाबत गोपनिय माहीतीच्या आधारे कारवाई करण्यात आली. यात  आरोपी  राजेंद्र सुरेश कांबळे यांच्याकडे एक गावठी कट्टा ( पिस्टल ) मिळुन आले त्यावरुन पोलीस स्टेशन तुळजापुर गुरनं . 465/2021 कलम 25 ( 3 ) शस्त्र अधिनियम सह कलम 188 , 34 , भादवीसह कलम 37 ( 1 ) ( c ) , 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन सदर गुन्हयाचा तपासात एकुण 5 आरोपी  सचिन खंड जाधव ,  शैलेश श्रीकांत नरवडे ,   मयुर बापु बनसोडे ,    विश्वजीत विजय आमृतराव , सौरभ दत्तात्रय टोले   यांना अटक करुन आरोपीतांकडुन एकुण 4 गावठी कट्टे ( पिस्टल ) व 3 जिवंत काडतुसे ( राउंड ) जप्त करण्यात आले आहे . सदरची कामगिरी   पोलीस अधीक्षक निवा जैन ,  अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत ,  उपविभागीय पोलीस अधिकारी , तुळजापुर डाँ . सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  आजिनाथ काशीद , सपोनि  सुशील चव्हाण , सपोनि  ज्ञानेश्वर कांबळे , पोउपनि  राहुल रोटे ,  चनशेट्टी ,  अजय सोनवणे , अतुल यादव , पोना . गणेश माळी ,   लक्ष्मी चव्हाण , अमोल भोपळे , गणेश पंतगे , अजित सोनवणे , बाळासाहेब देवबोणे यांनी केली आहे . 

 
Top