उमरगा  / प्रतिनिधी-

उमरगा पंचायत समिती सदस्या सौ. क्रांतीताई किशोर व्हटकर यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मौजे औराद व गुंजोटीवाडी येथे बसविण्यात आलेल्या हायमास्टचे उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघाचे आमदार  ज्ञानराज चौगुले व जिल्ह्याचे युवानेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्त बुधवार (दि.५) लोकार्पण करण्यात आले.

 पंचायत समिती सदस्यांच्या स्थानिक विकास निधीतून औराद व गुंजोटीवाडी येथे हायमास्ट बसविण्यात आले आहेत. या लोकार्पण सोहळ्यास औराद येथे पंचायत समिती सदस्या सौ. क्रांतीताई किशोर व्हटकर, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी भिसे, जेष्ठ शिवसैनिक दिनकर शिंदे, सरपंचपुत्र योगेश पाटील, गुणवंत पाटील, शिवसेना शाखाप्रमुख नागेश गायकवाड, युवासेना अध्यक्ष जितेंद्र कदम, माधव रणखांब,  विनोद पाटील, प्रवीण जाधव, अमोल पाटील, संजय स्वामी, योगेश पाटील, माधव पाटील,बळासाहेब पाटील, बालाजी पाटील तर मौजे गुंजोटीवाडी येथे ग्राप सदस्य शीतल हाक्के, राहुल माने, माजी ग्राप सदस्य दशरथ देवकते, राजेंद्र होनमाने, भीमा हाक्के, प्रकाश माशाळे, दयानंद लवटे, शेषेराव माने, ज्ञानोबा माशाळे, गुंडू माने, केरनाथ होनमाणे, खंडू जानकर, दिगंबर लवटे, गोविंद माशाळे  यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top