तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील सुरतगाव येथील झोपडपट्टी वस्तीजवळ स्त्री जातीचे नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळले. बुधवार (दि ५) रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा प्रकार उघड झाला. स्त्री जातीचे  अर्भक मृतावस्थेत आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती तामलवाडी पोलीस ठाण्यात कळवली ,त्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नवजात अर्भकाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी रवाना केला. पुढील तपास तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडित करीत आहेत.


 
Top