उस्मानाबाद /प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता कहर पाहता आरोग्य विभागाने १० जानेवारी रोजी जिल्हयात ३२ केंद्रावर लसीकरण माेहीम राबवली जाणार आहे. यामध्ये १८ वर्षांच्या वरील युवकांसाठी ६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तर १५ वर्षांच्या वरील मुलांसाठी ही डोस दिले जात आहेत. ६० वर्षांच्या वरील दोन्ही डोस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दक्षता डोस दिला जात आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, १०  जानेवारी रोजी शहरी भागात १८ वर्षांच्या वरील नागरिकांना कोवीडशिल्ड लसीचा पहिला व दुसरा आणि हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर तसेच ६० वर्षांच्या वरील नागरिकांना दुसरा डोस घेऊन ३९ किंवा ९ महिने झाले आहेत. अशांना दक्षता डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी आधार कार्ड सोबत आनने महत्वाचे आहे. हे डोस मुरूम, लोहारा, सास्तुर,वाशी, भ्ूम, तेर येथील ग्रामीण रूग्णालयात तर उमरगा, तुळजापूर, कळंब, परंडा येथे उपजिल्हा रूग्णालयात तर उस्मानाबाद येथे जिल्हा रूग्णालय व शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय येथे दिले जाणार आहेत. 

१५ वर्षांच्या वरील मुलांना ही डोस 

उस्मानाबाद जिल्हयात १० जानेवारी रोजी विविध २० लसीकरण केंद्रावर १५ वर्षांच्या वरील नागरिकांना कोवॉक्सीन लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर तसेच ६० वर्षांच्या वरील अजारी नागरिकांना दक्षता डोस दिला जाणार आहे. पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. व ज्यांनी दुसरा डोस घेऊन ९ महिने झाले आहेत, त्यांना दक्षता डोस दिला जाणार आहे. 

उमरग्यात नगर परिषद, आदर्श विद्यालय, के.डी.शेडगे विद्यालय, कें.डी.कनिष्ठ महाविद्यालय, उर्दु कनिष्ठ महाविद्यालय येथे दिले जाणार आहेत. तर कळंब मध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालय, फुले आंबेडकर वाचनालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर, आराधवाडी येथे दिले जाणार आहेत तर परंडा येथे सिध्दीवाल कॉम्पलेक्स व कल्याण सागर विद्यालय येथे दिले जाणार आहेत. मुरूम येथे माधराव पाटील महाविद्यालय सास्तूर येथे ग्रामीण रूग्णालय लोहारा येथे तालुका आरोग्य कार्यालय वाशी येथे कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय तेर येथे उर्दु शाळा भूम येथे एस.पी कॉलेज, उस्मानाबादमध्ये रामनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खिरनीमळा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हे लसीकरण केंद्र होणार आहे. नागरिकांनी ऑन दी स्पॉट नोंदणी करणे आवश्यक असल्याचे ही सांगण्यात आले आहे. 

कोरोनामुळे १५०९ लोकांना मृत्यू

उस्मानाबाद जिल्हयात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून ६७ हजार ७५ रूग्ण रूग्णालयात दाखल झाले होते. ६५ हजार ७०२ रूग्ण बरे होऊन घरी परतले. उपचारादरम्यान १५०९ रूग्णांचा मृत्यू झाला. शनिवार दि. ८ जानेवारी रोजी १ हजार २६ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६६ कोरोना रूग्ण सापडले आहेत. 

 
Top