परंडा / प्रतिनिधी :-

 स्वच्छ भारत मिशन नागरी अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2 अंतर्गत होकल फोर लोकल ब्रँड अँबेसिडर फोर एस एस 2022 करिता शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक डॉ. शहाजी चंदनशिवे यांची  मनीषा वडेपल्ली प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद परांडा यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे

  ही नियुक्ती 2022 करिता असून प्रत्यक्ष स्वच्छ भारत आणि स्वच्छ सर्वेक्षण व सुंदर अभियान या महाराष्ट्र शासनाच्या विभागांमध्ये परंडा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या कार्यक्रमासाठी असणार आहे अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली नगरपरिषद परांडा यांनी नियुक्तीपत्र देताना सांगितले.डॉ.शहाजी चंदनशिवे यांच्या नियुक्तीबद्दल माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर ,माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह  सद्दीवाल, माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील ,जिल्हा परिषद सभापती धनंजय सावंत, श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे, तसेच मित्र परिवार कडून  अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .

 
Top