उस्मानाबाद / प्रतिनिधी-

विद्यापीठ सुधारणा विधेयका विरोधात भाजपचे आंदोलन म्हणजे - चोराच्या उलट्या बोंबा , असा  प्रतिहमला   युवासेना - विस्तारक अविनाश खापे पाटील यांनी केला आहे.

विद्यापीठातील कंत्राट देण्याचे निर्णय असतील किंवा इतर सर्व महत्वपूर्ण निर्णय भाजपा व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे नेते आणि कार्यकर्ते यांच्या दबावाखाली कुलगुरू घेत असत, त्याला आळा घालन्याचे काम या सुधारणा कायद्यातून होत आहे.

आत्तापर्यंत कित्येक अधिसभा सदस्य यांच्या नियुक्त्या ह्या  शिक्षणाचा आणि त्यांचा काहीएक संबंध नसताना केवळ आणि केवळ भाजपा आणि त्यांची असणारी मातृ संघटना संघाशी संबंधित लोकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याने, 12 विद्यापीठांमध्ये, नियुक्त 99 टक्के सदस्य हे भाजप आणि संघाशी संबंधित असल्याचे पुरावे आहेत आणि म्हणूनच हा चाललेला शिक्षणाचा सावळा खेळ थांबवण्यासाठी विद्यापीठ सुधारणा विधेयक महाविकास आघाडी सरकारने आणले आहे !

अधिसभा सदस्य एवढ्यावरच नाही तर पात्रधारक, उमेदवारांना डावलून नियमात बसत नसताना देखील कुलगुरूं सारख्या महत्वाच्या नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या उदा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ येथे “कुलगुरुपदासाठी अत्यावश्यक निकषात असलेला MAJOR RESEARCH PROJECT (MRP) नसताना सुद्धा अवैध मार्गाने कुलगुरू पदी निवड करण्यात आली अशी एका नाही तर अनेक विद्यापीठांवर RSS च्या आप्तस्वकीयांच्या निवडी करण्यात आल्या याचे सर्व जाहीर पुरावे आहेत, जरा याचाही अभ्यास आंदोलनाची भाषा करणाऱ्या भाजप नेते आणि कार्यकत्र्यांनी करावा उगाच विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा अर्थहीन आणि बेगडा प्रयत्न करू नये !

अलीकडच्या काळात शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी हितासाठी घेतलेले निर्णय आणि होत असलेले बदल म्हणजे भाजपच्या नेत्यांचे उत्पादनाचे साधन संपुष्टात आल्याने सरकारवर टीका करण्याचा पोचट आटापिटा भाजप नेते आणि कार्यकर्ते करत आहेत !विशिष्ट अशा विचारसरणीच्या विळख्यातून शिक्षण, विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासन मुक्त होऊन येणाऱ्या काळात शिक्षणाचा स्तर उंचावल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांनी या भ्रमनिराश झालेल्या भाजप च्या आंदोलनाचा बळी पडू नये , असे आवाहन  

अविनाश खापे पाटील केले. 

 
Top